[ie_dailymotion id=x7g1j4u] दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या वादग्रस्त भाषणाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलमध्ये सुमारे तीन ते चार युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिथे उपस्थित असलेल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रोखले. संबंधित तरूण राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.