[ie_dailymotion id=x7g1gj1] ३० डिसेंबरपर्यंत नागरिकांना फक्त एकदाच जुन्या नोटांच्या स्वरुपात पाच हजारांपेक्षा अधिकची रोकड बँकेत जमा करता येणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून ही नवी सूचना देण्यात आली आहे. ३० डिसेंबरपर्यंत पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. मात्र आता ३० डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जुन्या नोटांच्या स्वरुपात स्विकारली जाईल, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.