राज्यात करोना प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ५ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान संचारबंदी तसेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलाय. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिस्थितीतीनुसार शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र संचारबंदी, जमावबंदी, टाळेबंदी या तिघांमध्ये काय फरक आहे हे अनेकांना कळत नाही. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या या तिन्ही गोष्टींमधील फरक जाणून घेऊयात..