कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय संपादीत केला. तर, भाजपा आणि जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) यांना पराभवाचा सामना करावा लागला. कर्नाटकात काँग्रेसला १३५ जागा, भाजपाला ६६ आणि जेडीएसला १९ जागांवर समाधान मानावे लागलं आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे.