Eknath Shinde: हिंदुत्वाला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी डॅमेज केलं. त्यांनी आता डॅमेज कंट्रोल बैठका घेऊन काय फायदा? असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे पिंपरी- चिंचवड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या संघर्ष पुरुष पुस्तकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार शंकर जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.