Rahul Gandhi Press Conference: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब टाकला आहे. ब्राझील माॅडेलने हरियाणात 10 वेळा मतदान केल्याचे राहुल यांनी सादरीकरणात दाखवून दिले. स्क्रीनवर सादरीकरण देत राहुल म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचे असल्याचे सांगितले होते. राहुल म्हणाले, “एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दाखवले होते. सर्व पोल हे भाकीत करत होते, पण असे काय झाले की हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतांमध्ये तफावत दिसून आली?”




















