छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानांकन मिळाले आहे. या किल्ल्यांच्या यादीत कोकणातील चार जलदुर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या दूरदृष्टीसाठी ओळखले जातात. महाराज युद्ध पारंगत होते त्याचबरोबर युक्ती आणि शक्तीच्या बळावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले. त्यांच्या दूरदृष्टीचे अनेक दाखले दिले जातात. त्याचेच उदाहरण म्हणजे आरमाराची स्थापना!