हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी वडील दीपक यादव यांनी पश्चाताप व्यक्त केला असून, फाशीची मागणी केली आहे. प्रेमसंबंधांमुळे हत्या झाल्याच्या अफवांना कुटुंबियांनी खोडून काढले आहे. दीपक यादव यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर कुटुंबियांनी या घटनेचा निषेध केला आहे.