भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) एअर इंडियाच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमधील वैमानिकांचा संवाद दिला आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाल्याचे समोर आले आहे. इंजिन १ आणि २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यामुळे हे इंजिन बंद झाले होते.