महाभारतामध्ये कौरवाचा मामा शकुनी याचं गांधार नावाचे राज्य होते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडे भारतीय गणराज्ये पसरली होती. ज्या ठिकाणी गांधार देश होता, तेथे आत्ताचा अफगाणिस्तान (Afghanistan)आहे. आशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या अफगाणिस्तानमधून प्रवासी, व्यापारी ये-जा करत असत. तेव्हा हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता. तेथे सापडेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि अन्य अवशेषांद्वारे एकेकाळी तेथे हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय राहत असल्याचा अंदाज लावला जातो. सध्या या देशामधील बहुतांश लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे.
सोव्हिएत युद्धानंतर सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर देशावर तालिबान या अतिरेकी संस्थेची सत्ता होती. पुढे अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे नाटोद्वारे हल्ला केला गेला. बरीच वर्ष अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. २०२१ मध्ये सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. काबुल (Kabul) ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. या शेजारी देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत. Read More
India help Afghanistan Against Pakistan : तालिबान सरकारने पाकिस्तानची पुन्हा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या निर्णयाला भारतानेही उघडपणे समर्थन…
5 Pakistani Soldiers Killed: अफगाणिस्तानातील सुरक्षि ठिकाणी राहून हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर हा लष्करी संघर्ष…
Pakistan Defence Minister Khawaja Asif: २०२१ मध्ये तालिबानने अफिगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासूनच्या त्यांचा पाकिस्तानशी झालेला सध्याचा लष्करी तणाव सर्वात मोठा आहे.…
Asim Munir: टीटीपीच्या कमांडरने म्हटले की, “असीम मुनीर, जर तुम्ही पुरुष असाल तर असहाय्य पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्याऐवजी तुम्ही…