scorecardresearch

अहमदनगर

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District)ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरीश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.
Read More
sangamner kirtan controversy balasaheb thorat demands action
संमगमनेरमधील वक्तव्यावरील वाद सुरूच; थोरांताची कारवाईची मागणी; संगमनेरमध्ये उद्या मोर्चा…

संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ahilyanagar food safety action against fake cheese
नगरमध्ये बनावट चीजप्रकरणी उत्पादक कंपनीस अन्न प्रशासनाची नोटीस…

नगरमध्ये खाद्यतेलापासून बनवलेल्या बनावट चीजप्रकरणी उत्पादक कंपनीला अन्न प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

newasa fire five dead news in marathi
Ahilyanagar Newasa Fire: नेवासा येथे फर्निचरच्या गोदामाला आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

पाचही जणांचा भाजून व गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना…

nevasa-kukdi-sugarcane-farmers-protest-for-pending-payments
कुकडी कारखान्याविरोधात नेवाशातील शेतकऱ्यांचे उपोषण…

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

father throws four children in well commits suicide
राहत्यात चार अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून वडिलांची आत्महत्या…

माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी परत येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेत जीवन…

shirdi growmore scam bhupendra savle custody
‘ग्रो मोअर’ फसवणूक प्रकरणी संचालक भूपेंद्र सावळेला कोठडी…

भूपेंद्र सावळे याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक झाली असून, पोलिसांनी त्याला शिर्डी न्यायालयात हजर करून कोठडी मिळवली.

ahilyanagar superintendent engineers chair
अहिल्यानगर : अधीक्षक अभियंत्यांच्या खुर्चीला ठेकेदारांकडून पुष्पहार, थकीत देयकांसाठी आंदोलन

निवेदनात नमूद केले, की विविध योजनांच्या निधीबाबत यापूर्वीही अनेक आंदोलने व निवेदने देण्यात आली; मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना झालेली नाही.

ganesh mandal online permission in ahmednagar
गणेशोत्सव मंडपासाठी संकेतस्थळावरून परवानगी; मंडप, कमानी उभारण्यासाठी नियमावली

एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात…

संबंधित बातम्या