अभिनेत्री अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली. याशिवाय तिने त्याच वर्षी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो’ मध्ये काम केले होते. या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तिने २०२२मध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा बॉलिवूड पदार्पण चित्रपट ‘लायगर’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. Read More
Actress Ananya Panday, Bikini Photos: मालदीव व्हेकेशनमध्ये अनन्या पांडेने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली. तिच्या आतापर्यंतच्या बिकिनी लूक्सवर एक नजर…