
अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून अनिल देसाई खासदार झाले आहेत. २०२४ ला अनिल देसाई यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली आणि ते खासदार झाले. अनिल देसाई यांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा ५३ हजार मताधिक्याने पराभव केला. अनिल देसाई यांना उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखलं जातं. दरम्यान, अनिल देसाई १९९७ मध्ये पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांची २००२ मध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीत सचिव पदावर त्यांची वर्णी लागली होती. तेव्हापासून शिवसेनेते ते महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.गेल्या दोन टर्मपासून अनिल देसाई राज्यसभेचे खासदार होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी लोकसभा लढवली आणि ते खासदार झाले. अनिल देसाई हे ठाकरे गटाचं पक्षाचं धोरणात्मक काम पाहतात.