scorecardresearch

असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.


अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.


अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.


Read More
Raja Singh Property Price
8 Photos
Photos | ओवेसींचे कट्टर विरोधक टी. राजा सिंह यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती अन् आलिशान गाड्या

टी राजा सिंह यांच्या नावावर एक शेतजमीन आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन ठिकाणी शेतजमिनी आहेत ज्यांची किंमत ३७ लाख…

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तावर टीका केली आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)
पाकिस्तानच्या ‘त्या’ मागणीवर असदुद्दीन ओवैसी का संतापले? असं नेमकं काय घडलं?

Asaduddin Owaisi On Pakistan : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या त्या मागणीवर संताप व्यक्त केला आहे, नेमकं काय म्हणाले…

Asaduddin Owaisi
“पाकिस्तानचा पर्दाफाश झालाय”, अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य

Asaduddin Owaisi on Pakistan : डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की “अमेरिकेच्या शूर जवानांनी इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ…

Asaduddin Owaisi statement on pok
Asaduddin Owaisi: “…तर आज पाकिस्तान राहिला नसता”, असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला पुन्हा फटकारले

Asaduddin Owaisi: तत्पूर्वी ओवैसी म्हणाले होते की, इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पाकिस्तानला दिला जाणारा निधी विकासासाठी वापरला जात नसून,…

‘भारत-पाक युद्धाचं सत्य आम्ही मांडलं’, मायदेशी परतलेल्या शिष्टमंडळाने काय माहिती दिली?

स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाटविया व रशियाचा दौरा करणारे द्रमुक खासदार कनिमोई यांच्या नेतृत्वाखालील पथक मंगळवारी दुपारी भारतात पोहोचले. तर, इंडोनेशिया,…

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : “तुरुंगात असताना एक दहशतवादी बाप बनला”, असदुद्दीन ओवैसी यांची अल्जेरियात पाकिस्तानवर सडकून टीका, म्हणाले…

भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळात ओवेसी यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ शनिवारी अल्जेरियामध्ये होते.

ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सर्वपक्षीय एकत्र येत असताना काँग्रेसचे हात बांधलेले का आहेत?

All Party delegations: एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या ठपका ठेवण्यात आलेल्या रूढीवादी प्रतिमेला खोडून काढले, काँग्रेस नेते शशी थरूर…

Asaduddin Owaisi speaking at a public event in Riyadh targeting Pakistan Army Chief Asim Munir
Asaduddin Owaisi: “पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा आणखी कोणता पुरावा हवा?”, सौदी अरेबिया दौऱ्यात ओवैसींची टीका

Asaduddin Owaisi On Terrorism: दहशतवादी संघटनांना पुरवल्या जाण्याऱ्या निधीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगत, ओवैसी यांनी पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अ‍ॅक्शन…

owaisi on pakistan
‘भिकमंगे’ ते ‘जोकर’; पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसींनी पाकिस्तानची लक्तरं कशी काढली? नक्की काय म्हणाले?

Owaisi roasted Pakistan after Pahalgam attack पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनेकवेळा पाकिस्तानची…

Asaduddin Owaisi
AIMIM MP Asaduddin Owaisi : “नक्कल करायला नालायकांकडे…”, ‘त्या’ फोटोवरून असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नेत्यांच्या…

संबंधित बातम्या