आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.
ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.
मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. Read More
शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन शेलार यांनी ठाकरे…
राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.
या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून जगभरातील व्यंगचित्रकारांनी पुण्यात यावे, या कलेचा अभ्यास करावा, अभ्यास-संशोधन करावे, चर्चा करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.…
बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…
रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलार यांनी सोमवारी केली व त्यानंतर रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची…