ऑटो उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते. अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.Read More
वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली. Volvo कार इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक…
नवरात्रीच्या शुभप्रसंगी यामाहा त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल्स व स्कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्स देत आहे, ज्यामुळे ही…
Harshavardhan Chitale Hero MotoCorp : हवर्षवर्धन चितळे यांच्याकडे तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.