भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.
जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.Read More
हिंदुस्थानच्या दारिद्र्याचा अर्थशास्त्रीय दृष्टीतून विचार दादाभाईंमुळे झाला. या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्ताने त्यांचे अर्थप्रबोधन स्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीत किती महत्त्वाचे…
अमेरिकेच्या आयात शुल्कात तीव्र वाढीच्या परिणामांची चिंता दूर सारत एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा…
जीडीपीच्या आकडेवारीत सेवा क्षेत्राचा वाटा नेहमीप्रमाणेच उजवा राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत घसघशीत कामगिरी करताना सेवा क्षेत्राने ९.३ टक्के एवढा वृद्धीदर…
अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कामुळे अडचणीत सापडलेल्या निर्यातदारांना सहाय्य प्रदान करण्यासाठी सरकार उपाययोजना आखत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
Against Against India: जेफ्री सॅक्स यांनी भारताला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांशी संबंध मजबूत करण्याचे आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) सारख्या प्रादेशिक…