डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. Read More
कल्याण डोंबिवली पालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर नुतनीकरण, पुनर्विकास आणि सुशोभिकरण करण्याच्या हालाचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या…
दिवाळी पहाट या कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील विविध भागातून तरुण-तरुणी ठाणे, कल्याण, डोंबिवली भागात गर्दी करतात. उत्सवात गैरप्रकार, चोरी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांकडून…
World Raw Powerlifting : मागील सहा महिन्यांच्या समर्पित सरावानंतर डोंबिवलीच्या स्पर्धकांनी दिल्लीतील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पदके मिळवून यश संपादन…