भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. १८१८ मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली.
पुढे साल १९५६ पर्यंत विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या देशामध्ये अस्तित्त्वामध्ये होत्या. तेव्हा सरकारने त्यांना ताब्यात घेत त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून १९५६ रोजी संसदेत एल आय सी कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी एलआयसीची स्थापना झाली. मुंबईमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सध्या भारतामध्ये २ लाखांपेक्षा जास्त एलआयसी एजंट्स कार्यरत आहेत.
कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जीवन विमा विभागामध्ये या संस्थेची मक्तेदारी आहे. २०२१ मध्ये एलआयसीद्वारे सुमारे ६,९३,९०४ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्या वर्षामध्ये तब्बल २,९७४ कोटींचा नफा संस्थेला झाला. Read More
एलआयसीच्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात आलेल्या स्थापत्यविषयक लेखापरीक्षण अहवालातून…
भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विमाधारकांकडून मुदतपूर्ती होऊनही दावा करण्यात न आलेल्या पॉलिसींचे ८८०.९३ कोटी रुपये पडून…