१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.
सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.Read More
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीची कामे, विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक…
नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकावर स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठकव्यवस्था, पाणपोया बंद, फेरीवाल्यांचा त्रास आणि असुरक्षितता यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मंगळवारी सकाळी कर्जतहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक सुटल्यानंतर दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली, एकमेकांच्या केस, झिंज्या उपटून एकमेकींना…