scorecardresearch

मराठी चित्रपट

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.


बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,


जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
had a great interaction with amruta subhash kishor kadam anita date and rishikesh gupte team jaran marathi movie released on 5 th june
अमृता सुभाषचा दमदार अभिनय, थरारक कथानक अन्…; ‘जारण’ सिनेमाच्या टीमशी गप्पा

मराठीत अनेक वर्षांनी एक ‘जारण’ सिनेमाच्या निमित्ताने एक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार…

pune samna movie 50 years satyashodhak socialist
पन्नाशीची उमर गाठलेला ‘सामना’ आणि ‘सत्यशोधक समाजवादी’

‘पद्मश्री’ने सन्मानित केल्यानंतर ‘सामना’च्या चित्रीकरणस्थळी डाॅ. श्रीराम लागू यांना चित्रमहर्षी व्ही. शांताराम आणि लता मंगेशकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

Marathi Film Festival in California NAFA Marathi Film Festival to be held in July
कॅलिफोर्नियात मराठी चित्रपट महोत्सव, ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव जुलैमध्ये रंगणार

यंदा हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे २५, २६ आणि २७ जुलै या कालावधीत दुसरा ‘नाफा’ मराठी चित्रपट होणार आहे, अशी माहिती…

Ashish Shelar statement regarding the movie Chidiya
स्वप्न, संघर्षाचे ‘चिडिया’मध्ये प्रभावी चित्रण; सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांचे प्रतिपादन

आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला ‘चिडिया’ हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi film release dates changed to avoid competition
स्पर्धा टाळण्यासाठी मराठी चित्रपटांच्या तारखांमध्ये बदल

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत आहे. यंदा जानेवारी ते मे महिन्यात तब्बल पन्नासहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असून…

shaatir marathi film release postponed to june 13
‘शातिर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले, २३ मे ऐवजी १३ जूनला प्रदर्शित होणार

मराठी चित्रपट ‘शातिर : द बिगिनिंग’ चे प्रदर्शन २३ मे ऐवजी आता १३ जून रोजी होणार आहे. एकाच दिवशी अनेक…

khalid ka shivaji
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’

Khalid Ka Shivaji : राज मोरे यांना आधी ‘खिसा'(२०२०) या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Marathi film Banjara
मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट

मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Mumbai four marathi films from Phalke Cinema City selected for Cannes Market section screening
‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, महाराष्ट्र शासनामार्फत शिष्टमंडळ रवाना

मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन…

Marathi films, May, films , loksatta news,
मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट

मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढत आहे आणि हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटांच्या स्पर्धेला न घाबरता मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातात, ही…

संबंधित बातम्या