scorecardresearch
PRESENTED BY

मराठी चित्रपट News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.


बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,


जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
bandkhor-poster-mahesh-manjrekar-chhaya-kadam-priyadarshini-indalkar
चेहऱ्यावर करारी भाव अन् बंडाची ठिणगी! महेश मांजरेकरांच्या ‘बंडखोर’चे पोस्टर रिलीज, ६ अभिनेत्रींचा बेधडक अंदाज

Bandkhor Marathi Movie Poster Release Mahesh Manjrekar: सहन करणं आणि गप्प राहाणं या चौकटी मोडीत काढत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या ६…

ZEE5 Marathi new shows | Devkhel 2 web series | Hey Kay Naveen 2 | Zee5 Marathi upcoming movies 2026
मराठी ‘झी ५’वर नामांकित कलाकारांच्या कलाकृती; ‘हे काय नवीन २’, ‘देवखेळ २’ या वेबमालिकांबरोबरच नव्या चित्रपटांचीही घोषणा

सध्या नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओसह जवळपास सगळ्याच ओटीटी वाहिन्यांना प्रादेशिक कलाकृतींची दखल घ्यायला लागते आहे.

Cultural Minister Ashish Shelar Marathi Gen Z Film Production Announcement | Maharashtra Government Marathi Cinema Investment Policy | Filmcity MD Swati Mhase Patil Marathi Film Industry Seminar | AI Technology Visual Effects Marathi Movie Industry Pu La Deshpande Academy
मराठी ‘जेन-झी’ला जोडण्यासाठी सरकारही चित्रपट निर्मितीत ; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर वाढवण्यावर भर.

Prasad Oak in Ajit Pawar Biopic movie | Pravin Tarde upcoming Marathi film Ajit Pawar | अजित पवार बायोपिक प्रसाद ओक | प्रवीण तरडे अजित पवार चित्रपट
“अजित पवारांच्या बायोपिकमध्ये दादांची भूमिका कोण साकारणार?” प्रसाद ओक म्हणाला, ‘प्रवीण तरडे फार कुचकट…’

‘धर्मवीर’नंतर आता अजितदादांच्या भूमिकेसाठी प्रसादने तयारीही सुरू केली असून प्रवीण तरडेंना आपले लूक टेस्टचे फोटो पाठवल्याचे सांगितले.

mamachya-govyala-jauya-box-office-collection-ankush-chaudhary
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने ११ व्या दिवशी कमावले ५ लाख, एकूण कमाई किती? बजेट वसूल होणार का? वाचा आकडेवारी

Mamachya Govyala Jauya Box Office Collection Day 11 : विजू माने दिग्दर्शित ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर…

tvf bayangi
‘पंचायत’, ‘गुल्लक’च्या निर्मात्यांची मराठीत एंट्री! ‘बायंगी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हे’ कलाकार झळकणार

TVF First Marathi Movie Bayangi Amey Wagh : ‘पंचायत’ आणि ‘गुल्लक’सारख्या ब्लॉकबस्टर सीरजनंतर आता द व्हायरल फीव्हर स्टुडिओजने आपल्या पहिल्या…

Jayanti 2 Marathi Movie Teaser | Shailesh Narwade Jayanti 2 Director | Ruturaj Wankhede Jayanti 2 Actor | Jayanti 2 Marathi Movie Release Date 11 September
‘जयंती २’मधून उलगडणार एका विद्यार्थिनीच्या वाट्याला येणारा भेदभाव

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जयंती’ या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा घडवली होती. आता त्याचा…

marathi-filmfare-awards-2026-winners-dilip-prabhavalkar-aata-thambaych-nay
Marathi Filmfare Awards 2026 Winners List: दिलीप प्रभावळकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते; तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार…, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Marathi Filmfare Awards 2026 Full Winners List: ११ व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने बाजी मारली…

Satish Pulekar Marathi Senior Actor talking about his students and struggle
“मी ज्यांना घडवलं त्यांनी…”; ज्येष्ठ मराठी अभिनेते सतीश पुळेकर खंत व्यक्त करत म्हणाले, “मी जिवंत आहे की मेलोय हेही…” फ्रीमियम स्टोरी

Senior Marathi Actor Satish Pulekar Students : नाटकांतून व चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी स्वतः…

jiya-shankar-fiance-karan-engagement-proposal-ring-photos
‘वेड’ फेम जिया शंकरने दिली प्रेमाची कबुली! दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली…

Jiyaa Shankar Engagement Photos: ‘वेड’ फेम आणि बिग बॉस ओटीटी फेम लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकर हिने प्रेमाची दिली आहे. जियाने…

ताज्या बातम्या