scorecardresearch

मेगा ब्लॉक

मुंबईची जीवनदायनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनचे मध्य, पश्चिम आणि हार्बर असे एकूण ३ प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय ठाणे ते वाशी या ट्रेनच्या मार्गाला ट्रान्स हार्बर असे म्हटले जाते. सकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास लोकल ट्रेनचा प्रवास सुरु होतो. ट्रेनच्या असंख्य फेऱ्या या रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान थांबतात. तेव्हा रात्री १ ते सकाळी ४ या सुमारास ट्रेनचा प्रवास बंद असतो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे सुरु असतात. त्यात रुळाची देखभाल, सिग्नल तसेच अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये बदल केले जातात. पण या कामांसाठी हा वेळ पुरेसा पडत नाही. त्यामुळे रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक लावून ही कामे चार ते पाच तासांमध्ये करण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी, अधिकारी करत असतात. त्यामुळे मेगा ब्लॉक हा लोकलसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो.


मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी किती तासांसाठी मेगा ब्लॉक होणार हे फार आधीपासून ठरवले जाते. एका रविवारच्या मेगा ब्लॉकसाठीची तयारी एक आठवडा आधीपासून केली जाते. गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी लोकलचे रुळ, सिग्नलचे पॉइंट्स, ओव्हरहेड वायर अशा असंख्य तांत्रिक गोष्टी तपासून घेतात. त्यात दोष आढळल्यास त्यांची नोंद करतात. या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या भागांकडे पाठवल्या जातात. पुढे यातील प्रमुख विभागाकडून परिचालन विभागाला मेगा ब्लॉक घेण्यासाठीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र तपासल्यावर परिचालन विभाग ब्लॉकची वेळ, गाड्यांचे वेळापत्रक वगैरे पाहून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. त्यानंतर हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शिवाय प्रवाशांनीही मेगा ब्लॉकची माहिती दिली जाते.


मेगा ब्लॉक (Mega Block) हे लोकसत्ता डॉट कॉमचे एक महत्त्वपूर्ण पेज आहे. या पेजवर मेगा ब्लॉक या विषयाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच वाचकांनी नव्या अपडेट्ससह येथे वाचायला मिळतील.


Read More
Central Railway announces Mega block
रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; माटुंगा-मुलुंड आणि कुर्ला-वाशी दरम्यान सेवा प्रभावित

मध्य रेल्वे मुंबई विभागात रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वाचे अभियांत्रिकी आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी मेगा…

five hour mega block on Vashi Panvel harbour line on Sunday July 27
वाशी–पनवेल दरम्यान रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक; सीएसएमटी–वाशीदरम्यान विशेष लोकलची सुविधा

हार्बर मार्गावरील वाशी–पनवेल स्थानकांदरम्यान येत्या रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ०४.०५ वाजेपर्यंत पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार…

Mega block on suburban sections on Sunday in Mumbai division of Central Railway
कोपर, ठाकुर्ली धीम्या रेल्वे स्थानकातील लोकल थांबा रद्द; प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकावरून करावा लागणार प्रवास

या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने…

Thane Municipal Corporation information 14 mega blocks of two hours of railway will have to be taken for the Thane East Satis Project
ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्पासाठी रेल्वेचे १४ मेगाब्लॉक ; वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता

मार्गिका जोडणीच्या कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक घ्यावे लागणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात नुकतीच एक…

Mumbai suburban railway Mega block Central, Western Harbour Railway line
मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीची कामे, विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक…

central railway will hold a mega block Sunday for track wire and signal maintenance
मध्य रेल्वेवर रविवारी ब्लाॅक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai local train mega block| Western Railway mega block Mumbai on Saturday Sunday
Mumbai Mega Block : पश्चिम रेल्वेच्या शनिवार-रविवारी १६२ लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली यार्ड येथे मोठा ब्लॉक

Mumbai Mega Block Saturday Sunday : शनिवारी दुपारी १ ते रविवारी मध्यरात्री १ दरम्यान पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर ३६…

Western Railway will conduct a Saturday night block for track signal and wire maintenance
कांजूरमार्ग-भांडूपदरम्यान गुरुवार, शुक्रवारी मेगब्लॉक

मध्य रेल्वेने कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mega block on Central Railway on Sunday
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या