scorecardresearch

निलेश लंके

निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. निलेश लंके यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचे खासदार असा राहिला. सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निलेश लंके याचं घर आजही पत्र्याचं आहेत. निलेश लंके यांचा जन्म १० मार्च १९८० रोजी पारनेरच्या हंगा या गावात झाला. २००४ रोजी ते हंगा शिवसेना शाखा प्रमुख झाले. त्यानंतर २००८ साली पारनेरचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख झाले. २०१० साली हंगा ग्रामपंचायतचे सरपंच झाले. २०१३ साली पारनेरच्या शिवसेना तालुका प्रमुखपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीतून पारनेर विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ दिली. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनतर नगर दक्षिणमधून निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार झाले.


Read More
over 400 objections filed ahilya nagar municipal ward restructuring plan
अहिल्यानगर महापालिका प्रभागरचनेवर ४१८ नागरिकांच्या ४१ हरकती

या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

Leopard kills three year old boy in Parner
पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; आठवड्यातील दुसऱ्या घटनेने घबराट…

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.

Nagar Manmad Road rahuri Accidents
राहुरीत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मोर्चा, मुंडन आंदोलन; नगर-कोपरगाव रस्त्यावर वाढते अपघात…

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूंवरून नागरिकांमध्ये संताप.

amravati municipal Corporation election ward structure triggers political moves print
निवडणुकांसाठी नगरमध्ये आघाड्यांची चाचपणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापण्याचे जाहीर केले.

MP Nilesh Lanka demand to the police regarding the vandalism of religious places
Nilesh Lanke: धार्मिकस्थळ तोडफोडप्रकरणी सखोल चौकशी व कठोर कारवाई करा; खासदार नीलेश लंके यांची पोलिसांकडे मागणी

शहरातील आनंदीबाजार भागात धार्मिकस्थळाच्या तोडफोडीची घटना सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी आहे. या घटनेची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर…

Nilesh Lanke Forms New Alliance in ahilyanagar
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा…

शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.

mva delegation led MP Nilesh Lanke meet District Collector
महापालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप नको; महाविकास आघाडीची मागणी

सन २०११ ची जनगणना, भौगोलिक सलगता, प्रभागाची सरासरी लोकसंख्या दहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवून रचना करण्यात आली होती. त्यामुळे ती नियमबद्ध…

नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याने लंकेंचे उपोषण मागे

जीवघेणा ठरत असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा, या मागणीसाठी खासदार लंके यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले…

संबंधित बातम्या