scorecardresearch

रेल्वे

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
 central railway disruption kasara local trains delayed after goods train breakdown between shahad and ambivli
कसाराकडे जाणारी लोकल सेवा ठप्प

नाशिक भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. तसेच या भागातील पाडे, गावातून नोकरदार मुंबईत…

Nagpur Broad gauge work between Itwari and Umred near completion pratap sarnaik
नागपूरमधील ईतवारी ते उमरेड ब्राॅड गेज रेल्वे मार्गाचा दिवाळीपूर्वी लोकार्पण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

१०६ किलोमीटर लांबीचा मार्ग राज्य शासनाच्या महारेल प्राधिकरणाकडून ब्राॅड गेज केला जात आहे.

AI in railway station india
मुंबई, दिल्लीसह देशातील ‘या’ रेल्वेस्थानकांवर बसवणार ‘फेशियल रिकग्निशन’ यंत्रणा; कारण काय? याचे फायदे अन् तोटे काय?

AI facial recognition railway security मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि नवी दिल्लीसह देशातील सात प्रमुख रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढविण्यासाठी…

Nagpur Umred new train to be launched before Diwali
दिवाळीपूर्वी नागपूर-उमरेड नव्या रेल्वेगाडीचा शुभारंभ !

देशातून नॅरोगेज रेल्वे मार्ग संपुष्टात आले आहे. सर्वात शेवटचा नॅरोगेज मार्ग नागपूर ते नागभीड या मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रुंपारित केले जात…

Mumbai Train Blasts case
७/११ मुंबई बॉम्बस्फोट निकालाला राज्य सरकार आव्हान देणार, १२ आरोपींच्या सुटकेवर सुप्रीम कोर्टात २४ जुलैला सुनावणी!

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार…

Passengers demand to speed up work on railway terminus in Vasai
वसईत रेल्वे टर्मिनस केवळ कागदावर कामाला गती देण्याची प्रवाशांची मागणी

२०१८ मध्ये तत्कालीन केंंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पुन्हा रेल्वे टर्मिनसची घोषणा करून २०२३ पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार…

Ramdas Athawale inaugurated Rail Coach Restaurant at Bandra Station
रेल्वेच्या डब्यात तयार केले रेस्टॉरंट; वांद्रे स्थानकात ‘रेल कोच रेस्टॉरंट’ चे रामदास आठवले यांनी केले उद्घाटन

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या ‘रेल कोच…

MNS welcomes video of woman being aggressive in Mumbai local train
मराठी भाषेसाठी सर्वसामान्य महिलाही आक्रमक; चित्रफितीचे मनसेकडून स्वागत

सर्वसामान्य महिलांमधील मराठी भाषेचा स्वाभिमान जागृत होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे मनसेने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकऱणी कुठलीही तक्रार न…

The railway line between Mumbai and Bhusawal was closed for 10 hours
मुंबई-भुसावळ दरम्यान रेल्वे वाहतूक १० तास बंद का ?

रात्री मुंबई-हैद्राबाद देवगिरी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर देवळाली – नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक…

संबंधित बातम्या