scorecardresearch

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
BEST workers society elections as BJP infighting benefits Shashank Rao Disputes within BJP over credit
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमुळे भाजपमधील वाद उघडकीस

आमदार प्रसाद लाड यांना कमी जागा आणि शशांक राव यांचा दणदणीत विजय या निकालाला भाजपमधील अंतर्गत वादच कारणीभूत ठरला आहे.

Raj Thackeray Pet Dog
Video: “ये पिल्लू…”, राज ठाकरेंचा छोटा श्वान थेट पत्रकार परिषदेत येतो तेव्हा, पुढे झालं असं… Video पाहा

Raj Thackeray Press Conference: राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना अचानाक त्यांचा पाळीव श्वान समोर…

Who is NV Modak Built Modaksagar
मोडकसागर धरणाला ज्यांचं नाव दिलंय ते नानासाहेब मोडक कोण होते? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना रोज नमस्कार केला पाहिजे”

Who is NV Modak : नानासाहेब मोडक हे एक जागतिक दर्जाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि नगररचना तज्ज्ञ होते.

Raj Thackeray Press Conference
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…

Raj Thackeray Reaction on BEST Election: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray Press Conference after fadnavis meet
Raj Thackeray Press Conference: राज ठाकरेंनी मुंबईतील ‘या’ समस्येवर ठेवलं बोट, थेट मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; म्हणाले…

Raj Thackeray Press Conference Today, 21 August 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली…

Sanjay-Raut-on-Raj-Thackeray_20250821051336.jpg
मुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरे यांची अचानक भेट, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “हा राजकीय अपराध…”

Sanjay Raut on Raj Thackeray-Fadnavis Meeting: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काल बेस्ट…

Raju Shetty Atmaklesh Yatra news
Maharashtra News Highlights: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही टोल वसुली? राजू शेट्टी म्हणाले, “वसुली बंद न केल्यास…”

Mumbai Maharashtra News Highlights: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Raj Thackeray Devendra Fadnavis (3)
“मुंबईकरांनी भाजपाला नाकारले, मग असुरी आनंद कशाचा?” मुंबईतील दोन निवडणुकींचा दाखला देत मनसेचा सवाल

MNS on BEST Credit Society Society Election : बेस्टच्या निवडणुकीत शशांक राव यांचं पॅनेल जिंकलं आहे. राव हे भाजपाचे पदाधिकारी…

Eknath Shinde targets Thackeray  brothers alliance on BEST election results loses all seats
Eknath Shinde : ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करते; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही महायुती प्रंचड बहुमतात जिंकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Mumbai municipal elections, Uddhav Raj Thackeray alliance, Marathi voter impact, BEST election results,
ठाकरे बंधूंच्या एकीची शून्याने सुरुवात प्रीमियम स्टोरी

‘बेस्ट’ पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीच्या पॅनेलचा धुव्वा उडाल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात काही चांगली झालेली नाही.

Sanjay Raut gave a reaction on Best Election
Sanjay Raut on Best Election: पतपेढी निवडणूक निकालाबाबत माहिती नाही, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे मनपा निवडणुआधी ठाकरे बंधूंसाठी हा धक्का…

best bus polls result today
बेस्टच्या पतपेढीची निवडणूक ८३ टक्के मतदान, ठाकरे बंधू आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई, आज निकाल

बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी पार पडली. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट…

संबंधित बातम्या