scorecardresearch

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Raj Saheb Thackeray with Dinkar Anna Patil, Maharashtra State Daily Wage Employees' Association Office Bearer
बिऱ्हाड मोर्चाचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या दारी; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

शिष्टमंडळाशी राज ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. दोन दिवसांत मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा…

Prakash Mahajan on Raj Thackeray
Prakash Mahajan: “गेलो तर राज ठाकरेंच्या खांद्यावरूनच…”, नाराजीनाट्यानंतर प्रकाश महाजन यांचे महत्त्वाचे विधान

Prakash Mahajan on Raj Thackeray: मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना दोन दिवसांच्या राज्यव्यापी शिबिरासाठी निमंत्रित न केल्यामुळे ते नाराज असल्याची…

nilesh sabale got phone call from raj thackeray
पुरस्कार सोहळ्यात मिमिक्री केली अन् दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी केला निलेश साबळेला फोन; पुढे काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेला अचानक राज ठाकरेंनी केलेला फोन…; पुढे काय घडलं? वाचा…

Raj Thackeray gave clarification on the alliances claims
Raj Thackeray Post: युतीच्या दाव्यांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

विजयी मेळाव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यानंतर नुकतंच पार पडलेल्या मनसेच्या शिबिरात राज ठाकरेंनी…

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात, “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, उद्धव ठाकरेंशी युतीच्या दाव्यांवर दिलं स्पष्टीकरण!

Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर युती करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे,

Prakash Mahajan On Raj Thackeray
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे युतीमुळे पालटेल का निवडणुकीचा खेळ? दोघांची कुंडली काय सांगते; वाचा ज्योतिषांचा अंदाज फ्रीमियम स्टोरी

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Prediction : मेळाव्यातील ठाकरे बंधूंच्या एकजुटीनंतर आता आगामी काळात महापालिका निवडणुकीत पुन्हा ही युती प्रत्यक्ष…

Uddhav Thackeray On Raj Thackeray
Uddhav Thackeray : “आता राज ठाकरेही बरोबर आलेत”, उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान; मुलाखतीचा टीझर लॉन्च

ही मुलाखत १९ आणि २० जुलैला प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचा विश्वासू शिलेदार पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष

Maharashtra Politics Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

mns leaders favor alliance while Raj Thackeray promises decision at the right time
राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी; महासंचालकांकडे लेखी तक्रार

पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली

nilesh sabale got phone call from raj thackeray
साहेबांचे १७ मिस कॉल होते…; निलेश साबळेची मिमिक्री पाहून राज ठाकरेंनी अचानक केलेला फोन, अभिनेता म्हणाला, “मला कळेना…”

‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेला अचानक राज ठाकरेंनी केलेला फोन…; पुढे काय घडलं? वाचा…

संबंधित बातम्या