सारा तेंडुलकर ही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची थोरली मुलगी आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडला राहायला गेली. साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. काही वर्षांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तिने आत्तापर्यंत दोन-तीन मॉडेलिंग प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Read More
Sachin Tendulkar Anjali Tendulkar Viral Video: सचिन तेंडुलकर संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. यादरम्यानचा सचिन-अंजलीचा एक व्हीडिओ व्हायरल…
Sachin Tendulkar Instagram Post: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये साखरपुड्यांच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच अर्जुन…