scorecardresearch

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
asim sarode
अलीबाबा आणि चाळीस चोरांचा खेळ उघड, अ‍ॅड. असीम सरोदे; गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदार-आमदारांवर कायमस्वरूपी बंदीची मागणी

शिवसेना धनुष्यबाण चिन्ह प्रकरणात शिंदे गटावर हल्लाबोल करत सरोदे म्हणाले, “शिंदेंसोबत गेलेले सर्व अपात्र आहेत. हा ‘अलीबाबा आणि चाळीस चोरांचा’…

Shinde shiv Sena MLA criticized uddhav thackeray then called balasaheb Thackeray his fathe
शिंदें सेनेच्या आमदाराने उद्धव ठाकरेंचा बाप काढला, अन आज बाळासाहेबांबत वेगळीच भूमिका घेत…

शिंदें सेनेच्या आणखी एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांचा बाप काढला आहे. दरम्यान, काही तासांतच…

Uddhav Thackeray Shiv Sena launched a public outcry movement demanding the removal of corrupt ministers from the state government
भ्रष्टाचाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांची अपरिहार्यता! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, राज्यभरात जनआक्रोश आंदोलन

भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेऊन सरकार चालविणे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपरिहार्यता व एककलमी कार्यक्रम असल्याचे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Eknath Shindes Displeasure Could Spell Trouble says Uday Samant
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास सर्वच अडचणीत… – उदय सामंत कोणाला म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसणाऱ्यांना शिंदेंचे काश्मीर दौरे दुखत आहेत,” असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

uddhav Thackeray shiv sena agitation
राज्य सरकार विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेचे जनआक्रोश आंदोलन

आंदोलकांनी आरोप केला आहे की, महायुती सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत आणि विधिमंडळात रमी खेळणे असे निंदनीय प्रकार…

Thackeray Sena's innovative 'Jan Aakrosh' in Buldhana
लेडीज बारवाले मंत्री, रमीबाज मंत्री, अघोरी पूजा व कर्मचाऱ्यास मारहाण करणारे…जिवंत देखावे चर्चेचा विषय; ठाकरे सेनेचा अभिनव ‘जन आक्रोश’

आज सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी स्थानिय जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आलेले जन…

thane shiv sena Thackeray protest
Video: ठाण्यातील रस्त्यावर डुप्लीकेट संजय शिरसाट, माणिक कोकाटे, योगेश कदम; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

ठाकरे गटाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सोमवारी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

Shiv Sena Thackeray party protests against the state government in Ratnagiri
रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन

यावेळी आंदोलनात सत्ताधारी नेत्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांवर आणि कथित घोटाळ्यांवर टीका करण्यात आली. “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते?”…

shivsena ubt protest led by Ambadas Danve against state government ministers
‘संजय नोटावाले, रमीराव ढेकळे अशी तिरकस नावे देत शिवसेनेचे आंदोलन

‘मला लाज वाटते ’अशी घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारला खिजवणाऱ्या घोषणा दिल्या. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील…

संबंधित बातम्या