scorecardresearch

सिद्धार्थ जाधव Videos

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
Siddharth Jadhav on toll Incident: खालापूर टोल नाक्याचा प्रसंग, सिद्धार्थ जाधवने सांगितला अनुभव
Siddharth Jadhav on toll Incident: खालापूर टोल नाक्याचा प्रसंग, सिद्धार्थ जाधवने सांगितला अनुभव

खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यांनी टोल कर्मचाऱ्याला ठाकरे शैलीत दम भरला…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×