scorecardresearch

सिद्धार्थ जाधव Photos

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
siddharth jadhav raj thackeray meet
12 Photos
आधी मजेशीर गप्पा, नंतर खांद्यावर हात ठेवत फोटोसाठी पोज; राज ठाकरे-सिद्धार्थ जाधवच्या फोटोने वेधले लक्ष

“राज साहेबांच्या सोबतच्या क्षणांची खूप गोड आठवण देणारी दिवाळी”, असेही त्याने हा फोटो शेअर करताना म्हटले.

de dhakka 2 movie london shooting photos
12 Photos
Photos : ‘दे धक्का २’ टीमची लंडनमध्ये धमाल; शूटिंगदरम्यानचे फोटो पाहिलेत का?

लंडनमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो गौरीने इंगवलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Siddharth Jadhav Siddharth Jadhav divorce
9 Photos
Photos : घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सिद्धार्थ जाधवच्या पत्नीची मुलींबरोबर पार्टी, पाहा फोटो

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी तृप्तीपासून गेल्या दोन वर्षांपासून तो वेगळं राहत असल्याच्या चर्चाही मध्यंतरी…

siddharth jadhav, trupti jadhav, trupti, siddharth jadhav
11 Photos
Photos : सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा?, दुबई ट्रिपदरम्यान एकही एकत्रित फोटो नाही

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ कुटुंबाबरोबर दुबई…

siddharth jadhav, entertainment
9 Photos
Photos : सिद्धार्थ जाधवची कुटुंबाबरोबर दुबई ट्रिप, महागड्या गाडीची सफर अन् बरंच काही

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो तो शेअर करत असतो. सिद्धार्थ आपल्या कुटुंबाबरोबर दुबईला गेला…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×