scorecardresearch

सिद्धार्थ जाधव News

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
siddharth jadhav bhushan kadu and mayuri deshmukh lagna kallol marathi movie trailer out
Video: प्रेम, लग्नातील गोंधळ अन्…; सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

१ मार्चला कल्लोळ घालायला येतायत सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख व भूषण प्रधान

siddharth jadhav bhushan pradhan lagna kallol new movie
सिद्धार्थ जाधव मोठ्या पडद्यावर घेऊन येणार ‘लग्न कल्लोळ’! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीसह शेअर करणार स्क्रीन, कोण आहे ती?

सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानच्या नव्या चित्रपटाची घोषणा! ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीसह शेअर करणार स्क्रीन

Tejashri pradhan vs Aamne Samne and Aaichya Gavat Marathit Bol Artist aata hou de dhingana 2 new promo out
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘आई कुठे काय करते’ला हरवल्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला टक्कर द्यायला येणार ‘ही’ मंडळी

Aata Hou De Dhingana 2: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला कोण टक्कर देणार? जाणून घ्या…

aai kuthe kay karte milind gawali Appreciated Siddharth Jadhav
“त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक, म्हणाले, “बारा-चौदा तास…”

अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

siddharth jadhav attend iffi festival at goa
Video : IFFI च्या रेड कार्पेटवर सिद्धार्थ जाधवचा जलवा! दिग्गजांबरोबर झाला अभिनेत्याचा सन्मान; नेटकरी म्हणाले, “अंगावर शहारे…”

Video : IFFI च्या रेड कार्पेटवर पोहोचला आपला सिद्धू! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला सन्मान, व्हिडीओ व्हायरल

siddharth jadhav aata hou de dhingana show become number on non fiction show of maharashtra
“धाकधूक होती पण…”, TRP च्या शर्यतीत सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊदे धिंगाणा’ने मारली बाजी! पाहा संपूर्ण यादी

आता होऊ दे धिंगाणा २ : छोट्या पडद्यावर सिद्धार्थ जाधवचा धिंगाणा! पाहा कोणता रिअ‍ॅलिटी शो कितव्या स्थानी?

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×