सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.
पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.
पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो. Read More
राजकारणात आजपर्यंत एवढे गोंधळलेले विरोधक कधीही पाहिले नाहीत, त्यांच्या चकरा म्हणजे केवळ ‘फियास्को’ असल्याचे टीकात्मक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…