11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक

सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १९ जागांकरिता ८४ उमेदवारांनी १२५ अर्ज दाखल केले आहेत.

पत्नीकडून पोटगीसाठी पतीची न्यायालयात धाव

हलाखीचे जीवन जगणारया नवऱ्याने मुख्याध्यापक पत्नीकडून पोटगी मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

दहशतवादाच्या छायेत वस्त्रोद्योजकांचा इटली अभ्यास दौरा

जगाला हादरा बसला असताना इटली येथे ‘इटमा’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांनी आपला इटली अभ्यास दौरा कायम ठेवला.

कळंबा कारागृहामध्ये कैद्यांची ओली पार्टी

कळंबा कारागृहामध्ये कैद्यांकडून मद्यसेवन, गांजा ओढणे, मांसाहारी भोजन आदी स्वरूपाच्या पार्टीचे प्रकार होत असलेला प्रकार उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली.

बेकायदा सावकारीप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

कर्जाची परतफेड करूनही व्याजासह आठ लाखांची रक्कम वसूल करण्यासाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरात गणवेशाअभावी १५ विद्यार्थी परीक्षेला मुकले

सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गणवेश नसल्याचे कारण देत शिस्तीचा बडगा उचलत १५ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले गेले नाही.

दीपक िशदे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

तालुका समितीवर वर्णी लावली म्हणून भाजपाचे नेते दीपक िशदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

ऊस दर बठक निर्णयाविना

साखर उद्योगाच्या कोलमडलेल्या अर्थकारणाच्या पाश्र्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे पुणे येथे झालेली ऊस दर प्रश्नाची बठक फोल ठरली.

माफीचा साक्षीदार होण्यासाठी आपल्यावर पोलिसांचा दबाव

माफीचा साक्षीदार करून तुला २५ लाख रुपये देण्यात येतील. अन्यथा तुला फासावर लटकवले जाईल अशा शब्दात पोलिस वर्दीतील व्यक्तीने आपणास धमकावले आहे.

वसंतदादा कारखाना बंद करण्याचे आदेश

राखेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने वसंतदादा साखर कारखाना बंद करावा असा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरिष्ठ कार्यालयाकडे धाडला आहे.

मराठवाडय़ात यंदा भीषण पाणीटंचाई

मोजकेच अपवाद वगळता मराठवाडय़ात सर्वत्रच यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद तिसऱ्या क्रमांकावर

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या शौचालय बांधकामात उस्मानाबाद जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी २४ तास ग्रंथालयाची सोय

ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शन मिळावे, या हेतूने परळी येथे आयएएस स्टडी सर्कल स्थापन केली असून २४ तास ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध असणार आहे.

संगीत दीपोत्सवात सूरमयी जुगलबंदी

उस्मानाबादच्या संगीत रसिकांना स्वरचतन्याने भारून टाकणारा आणि मनोदीप उजळविणारा संगीत दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.

एटीएम कार्डचा नंबर विचारत खात्यातून ४८ हजार लांबवले!

एटीएम कार्डचा सोळा अंकी नंबर मिळवून अवघ्या पाच मिनिटांत बँकेच्या खात्यावरून तब्बल ४८ हजार रुपये अलगद काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार शहरात घडला.

औरंगाबाद-पैठण रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा

औरंगाबाद-पठण रस्त्याचे दुरुस्तीचे काम तत्काळ सुरूकरण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी दिल्या.

मुख्य अभियंत्यास कार्यकारी संचालकांकडून समज

मुख्य अभियंत्यांच्या पत्राची गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आली आहे.

लातूरसाठी जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाची शिफारस

उस्मानाबादपर्यंत आलेल्या जलवाहिनीतून लातूरला पाणी देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी शिफारस विभागीय आयुक्तांनी मंगळवारी शासनाकडे केली आहे.

२२ हजार विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळी

फटाक्यांची खरेदी करण्याऐवजी त्या पशातून पुस्तके, खेळणी व किल्ले बांधणीचे साहित्य खरेदी करण्याचा संकल्प जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांनी केला.

महापालिकेचा हजार कोटींचा अर्थसंकल्प

तब्बल १ हजार कोटी रुपयांपर्यंतचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी महापौरांकडे सादर केला.

काळेवाडीत सराफाला लुटण्याच्या गुन्ह्य़ात रिक्षाचालकांचा सहभाग

दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने काळेवाडी येथे सराफाला शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

एम्प्रेस गार्डनची माहिती पुस्तकरूपात

वृक्षप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या एम्प्रेस गार्डनचा इतिहास आणि या उद्यानात असलेल्या वैशिष्टय़पूर्ण वृक्षांची माहिती पुस्तकरूपाने उपलब्ध झाली आहे.

खरेदीसाठी बाजारपेठा ‘हाऊसफुल्ल’

दिवाळीला विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकर मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडल्याने शनिवारी बाजारपेठा अक्षरश: हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र होते.

महापौरांकडून पालकमंत्र्यांना डाळींची भेट

डाळींच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना डाळींची दिवाळी भेट शनिवारी देण्यात आली.

Just Now!
X