06 August 2020

News Flash

Ishita

शेतीतील प्रयोगांना प्रोत्साहन हवे- डॉ. भोईटे

‘आज शेतीमध्ये प्रयोग करेणही जिकिरीचे झालेले आहे. सातत्याने शेतीत प्रयोगांची गरज असते. यासाठी शेतीतील प्रयोगांना व्यापक प्रोत्साहन दिले पाहिजे.’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले.

संध्यादेवी कुपेकर यांना तिन्ही पाटलांचा पाठिंबा

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत ईष्र्येने उतरलेल्या चंदगड तालुक्यातील तिन्ही पाटलांनी बुधवारी संध्यादेवी कुपेकर यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे बुधवारची संध्याकाळ कुपेकरांसाठी उजळल्याचे स्पष्ट झाले. नरसिंग गुरुनाथ पाटील, भरमू सुबराव पाटील व गोपाळराव पाटील या तिघा मातब्बरांचे पाठबळ मिळाल्याने कुपेकरांची बाजू भक्कम झाली आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील चुरशीचे रंग फिके होत चालल्याचे जाणवू लागले आहे.

आधारकार्ड’मधील गैरव्यवस्थेबाबत कोल्हापुरात भाजपचे निवेदन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना आधारकार्ड नोंदणीमधील अनागोंदीच्या कारभाराबाबत भेटून निवेदन दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, विजय जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, अशोक देसाई, प्रभाताई टिपुगडे, सुभाष रामुगडे, किशोर घाटगे यांच्या समावेश होता.

सुरेश शिवगोंडा पाटील यांचे अपघाती निधन

भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने भाजपचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सुरेश शिवगोंडा पाटील हे ठार झाले. हा अपघात हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर मंगळवारी रात्री उशीरा झाला.

इचलकरंजी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम

इचलकरंजी नगरपालिकेने बुधवारी लालनगर भागात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली. यापूर्वी दोन वेळा झालेल्या विरोधाप्रमाणे आजही तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला. तथापि पोलीस बंदोबस्तात लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून आठ घरकुलातील अतिक्रमण काढण्याचे काम दिवसभर सुरू होते.

चंदगड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संध्यादेवी कुपेकर

चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेरीस संध्यादेवी कुपेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही पक्षांकडून निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. तर काही पक्षांनी निवडणूक तडफेने लढविण्याचा निर्धार केला आहे. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात संध्यादेवी कुपेकर या प्रथमच राजकारणात पहिले पाऊल टाकीत असून, त्यांचे पदार्पण कसे होते याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे.

सामान्य माणूस सहकारी बँकांचा खरा आधार – अनास्कर

सामान्यातील सामान्य माणूस हा सहकारी बँकांचा खरा आधार असून, देशाची अर्थव्यवस्था ही सहकार चळवळ जिवंत राहण्यासाठी ९७ व्या घटनादुरुस्तीमध्ये येऊ घातलेले बदल निश्चितच बदल घडविणारे आहेत, असे मत महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

सोलापूर-पुणे हिवाळी सुपरफास्टला चौथ्यांदा मुदतवाढीची शक्यता

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने हिवाळी हंगामात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सोलापूर-पुणे सुपरफास्ट या साप्ताहिक एक्स्प्रेसला सलग चौथ्यांदा मुदतवाढ मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गुटख्याची विक्री

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांच्या कार्यालयातील टेबलवर गुटख्याच्या पुडय़ा टाकत कोल्हापूर जिल्हय़ात खुलेआम गुटखा कसा विकला जात आहे, असा सवाल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. या कार्यालयाच्या आवारात पडलेल्या गुटख्याच्या रिकाम्या पुडय़ा दाखवत कार्यालयातही खुलेआम गुटखा खाल्ला जात असल्याचे दाखवून दिव्याखाली अंधार कसा आहे, हे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना दाखविले.

करमाळ्यात बागलविरुध्द गुन्हा दाखल होण्यासाठी धरणे आंदोलन

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर या तालुक्यातील आमदार श्यामल बागल व माजी आमदार जयवंत जगताप यांच्यातील संघर्ष उफाळला आहे. त्याची परिणती एका प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली म्हणून आमदार श्यामल बागल यांचे पुत्र तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बागल विरोधकांनी एकत्र येऊन करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

माणुसकी टिकवण्यासाठी समाजाला काहीतरी द्यायला शिका- देशमुख

माणूस पैशाच्या, सत्तेच्या हव्यासात गुरफटत चालल्याने समाजातील माणूसपण हरवत चालले आहे. तरी समाजाला काहीतरी द्यायला शिका, तरच आपण माणूस म्हणून लायक आहोत, असे मत वसुंधरा प्रकल्पाचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.

सोलापुरात हवाला रॅकेट; कुरिअर कंपनीच्या तिघांना अटक

सोलापुरातील विविध कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून हवालाद्वारे लाखोंची रोकड रेल्वेने परगावी जात असताना रेल्वे पोलिसांनी छापा टाकून तिघा जणांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे २२ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. या तिघा जणांविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अपुरा पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ इचलकरंजीत घागर मोर्चा

इचलकरंजी येथील सुतारमळय़ात पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी चौकात पालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

स्वामी विवेकानंद रथयात्रेचे आज कराडात आगमन

स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रामकृष्ण मठ, पुणे व श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कराडात मंगळवारी (दि. २९) स्वामी विवेकानंद रथयात्रेचे आगमन होणार आहे. कराडसह सैदापूर व मलकापूर येथे रथयात्रा येणार आहे. या निमित्त ठिकठिकाणी चित्र प्रदर्शन व गं्रथ विक्री आणि व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

जयश्री खाडिलकर यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार

गुंफण अकादमीतर्फे देण्यात येणारा गुंफण गुणगौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बुद्धिबळपटू व पत्रकार जयश्री खाडिलकर-पांडे यांना जाहीर झाला असल्याची माहिती अकादमीचे प्रमुख बसवेश्वर चेणगे यांनी दिली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधन व समाजपरिवर्तनासाठी अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवार्थ अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

मुन्ना दायमा यांचे निधन

काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत ऊर्फ मुन्ना दायमा (वय ६०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रस्त्यावरील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

रस्ते विकास प्रकल्पातील कामांविषयी १ फेब्रुवारी रोजी बैठक

शहरात राबविण्यात आलेल्या २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पातील निकृष्ठ दर्जाच्या कामांविषयी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. तरी ही बैठक मुंबईत न घेता कोल्हापूरमध्ये घ्यावी, असे पत्रक कॉमन मॅनच्या वतीने बाबा इंदूलकर, जीवन कदम, काका पाटील, अमित अतिग्रे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

सोलापुरातील बँक खाते हॅक करून अमेरिकेतून फसवणूक

बँक ऑफ इंडियामधील बचत खाते हॅक करून अमेरिकेतील अटलांटामध्ये असलेल्या व्यापाऱ्याकडे तीन लाख ८४ हजारांची खरेदी करून फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामटय़ाविरुध्द सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

‘बिझनेस गप्पा’ कार्यक्रम

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करणारे क्विकहिल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर व तांत्रिक संचालक संजय काटकर यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविणारा ‘बिझनेस गप्पा’ हा कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित केला आहे.

काळूबाईच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

काळूबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. यावर्षीच्या यात्रेने भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडला.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संध्यादेवी कुपेकरांची उमेदवारी जवळपास निश्चित

दिवंगत नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे येण्याचे स्पष्ट संकेत रविवारी झालेल्या मेळाव्यात स्पष्टपणे मिळाले. चंदगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांचीच उमेदवारी निश्चित होईल, असे या मेळाव्यातून दिसून आले.

कुरीअरद्वारे पाठविलेली रक्कम लुटणाऱ्या गुन्हेगारांना पकडले

कुरीअर कंपनीत जमा झालेली ११ लाख ७८ हजारांची रोकड बळजबरीने चोरून नेणाऱ्या चोरटय़ांचा शोध शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला असून याप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. ही चोरी करण्यासाठी टीप देणारा व्यापारीही जाळय़ात सापडला.

शिक्षण हक्क कायद्याद्वारे मुलांना जबाबदार नागरिक बनवा- ढोबळे

शिक्षण हक्क कायद्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देऊन देशाचा जबाबदार नागरिक बनविण्याचे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.

कोल्हापुरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऐनवेळी ग्रामसभा रद्द करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र प्रजासत्ताकदिनी ग्रामीण भागात पाहावयास मिळाले. ग्रामसभा होणार या अपेक्षेने गावोगावी जमलेल्या ग्रामस्थांचा हिरमोड झाला. दरम्यान प्रजासत्ताकदिनाचा ६३ वा वर्धापनदिन कोल्हापुरात उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले.

Just Now!
X