Mumbai Maharashtra News: एकीकडे गणरायाच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातलं वातावरण भक्तीमय झालेलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट व शिंदे गट यांनी एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून त्यावरील विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
Marathi Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्याने चक्क लालबागचा राजाच्या चरणी तशी चिठ्ठीच ठेवली आहे! अशा प्रकारच्या गोष्टी करू नका, अशी विनंती अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
गैरों पे करम, अपनों पे सितम अशी भाजपाची अवस्था झाली आहे. बाहेरच्यांना भरपूर संधी आहे. पण ज्यांनी त्या पक्षासाठी मेहनत घेतली, त्यांच्यासाठी त्यांच्याकडे काहीही संधी नाही – अतुल लोंढे
ते आम्हाला काय व्हिप बजावणार? २०२४ ला यापैकी कुणीच संसदेत नसेल. २०२४ ला यांची पाटी कोरी असेल. यापैकी एकही खासदार संसदेत नसेल. मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल हे नक्की आहे – संजय राऊत</p>
Marathi Live News Today: ठाकरे गट व शिंदे गटामध्ये राजकीय कलगीतुरा!