-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.
-
या मुलाखतीत अजित पवार यांनी काँग्रेस पक्ष हा सोयीचं राजकारण करतो असं म्हटलं आहे.
-
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधानात बदल करण्यात येईल, असा वादा काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
-
महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
-
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
-
“काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांना विरोध केला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेच त्यांचा पराभवही केला होता. मुळात काँग्रेसने कधीही संविधान दिवस साजरा केला नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली”, असे अजित पवार म्हणाले.
-
“स्वत: काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काही केलं, तर त्यांच्या विरोधात चुकीचा प्रचार करायचा, ही काँग्रेसची पद्धत आहे”, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.
-
“तसेच आपल्या देशातील संविधान उत्तम आहे. ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ४०० जागा जिंकल्यावर भाजपा संविधान बदलेल, हा आरोप चुकीचा आहे. यात कोणतेही तथ्य नाही”, असेही ते म्हणाले.
-
(सर्व फोटो साभार- अजित पवार/फेसबुक पेज)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”