-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. काल त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला आहे. (पीटीआय फोटो)
-
मात्र त्याआधी त्यांनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर पूर्ण विधिवत गंगा पात्राची पूजा केली. यानंतर पंतप्रधानांनी मंत्रोच्चारांसह गंगा आरतीही केली. (पीटीआय फोटो)
-
वैदिक ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधानांनी गंगा सप्तमी दशाश्वमेध घाटावर गंगा मातेचा दुग्ध अभिषेक केला आणि पूर्ण भक्तिभावाने पूजा केली. (पीटीआय फोटो)
-
यावेळी घाटावर उपस्थित हजारो लोकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत पंतप्रधानांचे स्वागत केले. पीएम मोदी येथे क्रूझमध्ये बसून घाटावर पोहोचले होते. (पीटीआय फोटो)
-
गंगा पात्राचे पूजन केल्यानंतर पंतप्रधान काशीच्या कोतवाल बाबा कालभैरवाच्या पूजेसाठी रवाना झाले. (पीटीआय फोटो)
-
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. (पीटीआय फोटो)
-
त्यानंतर, २०१९ मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि विजयीही झाले. आता २०२४ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी दाखल केला आहे. (पीटीआय फोटो)
-
उमेदवारी अर्ज दाखल करतांना गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जवळपास १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मोठे नेतेही वाराणसीत काल पोहोचले हाते. (पीटीआय फोटो)
(हे देखील वाचा: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : उद्धव ठाकरे आणि व्यावसायिक भावेश भिंडेच्या फोटोवरून छगन भुजबळ म्हणाले, “ही चौकशी…” )

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्