-
बालिका वधू या मालिकेतून छोट्या आनंदीच्या भूमिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अविका गोर तिच्या कथित प्रियकरासोबत 'कान फिल्म फेस्टीव्हल'च्या रेड कार्पेटवर दिसून आली.
-
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील सहकलाकार मनीष रायसिंघानीसोबत अविका कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये एका फ्रेंच चित्रपटाच्या ट्रेलरसाठी रेड कार्पेटवर उपस्थित होती.
-
जांभळ्या रंगाचा वेस्टर्न आऊट फिट परिधान केलेल्या अविकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Source: IANS)
-
अभिनेत्री अविका गौर तिच्या सहकलाकाराला डेट करत असल्याचे वृत्त गेल्याच महिन्यात माध्यमांमध्ये झळकले होते. कानच्या रेड कार्पेटवर दोघांच्या उपस्थितीमुळे या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. (Source: Photo posted on Instagram by Avika Gor)
-
अविका गौर आणि मनीष रायसिंघानी या दोघांच्या एका लघुचित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. (Source: Photo posted on Instagram by Avika Gor)
-
आपल्या लघुपटाचा ट्रेलर पाहताना अविका आणि मनीष. (Source: Photo posted on Instagram by Avika Gor)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल