-
अभिनेता रणवीर सिंगच्या 'बेफिक्रे' या चित्रपटाची सध्या चित्रपट वर्तुळामध्ये प्रचंड चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसणारे वाणी कपूर आणि रणवीर सिंग अनेकांचीच मने जिंकत आहेत.
-
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटामध्ये रणवीरने साकारलेल्या योद्ध्याच्या भूमिकेला शह देणारे पात्र तो या चित्रपटामध्ये साकारत आहे. त्यामुळे एका क्षणाला हाच का तो रणवीर? असा प्रश्नही पडल्यावाचून राहात नाही.
-
आपल्याच धुंदीत असणारे रणवीर आणि वाणी या ट्रेलरमधून आपल्याला पाहाला मिळत आहेत. रोमान्स, मस्ती आणि रणवीर-वाणीची अफलातून केमिस्ट्री या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-
‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण फ्रान्समध्ये करण्यात आले आहे.
यशराज फिल्म्सच्या निर्मितीत साकारलेल्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. -
‘यशराज फिल्म्स’ या बॅनर अंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रणवीर सिंग प्रथमच निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करणार आहे.
-
संगीतकार जोडी विशाल-शेखर यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून जयदीप साहनी यांनी चित्रपटातील गाणी लिहिली आहेत.
-
साचेबद्ध प्रेमकहाणीच्या चौकटीपलीकडे जात त्यांचा हा चित्रपट रसिकांवर कितपत भुरळ पाडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
-
९ डिसेंबरला रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर