-
बॉलिवूडमध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबतच त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ओळखल्या जातात. मात्र मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हे वातावरण फार कमी पाहायला मिळतं. (सर्व फोटो : सुकन्या काळण, ट्विटर)
-
सुकन्या काळणनं लक्स एकापेक्षा एकमध्ये फुलवा खामकर हिच्या मार्गदर्शनाखाली ‘ये मेरा दिल प्यारका दिवाना’ हा डॉनमधील पहिला डान्स केला आणि नंतर तिची सतत चढती कमानच सुरू झाली.
-
सुकन्या काळणचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत.
-
आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या सुकन्याचे हे फोटोदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
-
काही दिवसांपूर्वी केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळेही ती खुप चर्चेत आली होती. तिच्या न्यूड फोटोशूटनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातली होती.
-
एकापेक्षा एक या शोनंतर सुकन्यानं चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ‘मेनका उर्वशी’, ‘तु का पाटील’ या चित्रपटात झळकली होती.
-
याव्यतिरिक्त तिनं काही मालिकांमध्येही काम केलं आहे. ती ‘कन्यादान आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्येही छोट्या पडद्यावर दिसली होती.
-
सुकन्यानं शेअर केलेल्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.
-
तिनं नृत्यातील अदांनीही अनेकांना आजवर घायाळ केलं आहे. तिच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल