अॅमेझॉन प्राइमवर 'मिर्झापूर २' ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्यांकडे खऱ्या आयुष्यात किती संपत्ती आहे ते जाणून घेऊयात.. या वेब सीरिजची संपूर्ण कथा कालीन भैय्या या पात्राभोवती फिरते. ही भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठींची एकूण संपत्ती ही जवळपास ३० कोटी इतकी आहे. गुड्डू पंडितची भूमिका साकारणारा अली फजल एकून २३ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. किंग ऑफ मिर्झापूर मुन्ना त्रिपाठीची दमदार भूमिका दिव्येंदु शर्माने साकारली आहे. त्याची जवळपास १४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. गोलूची भूमिका साकारणारी श्वेता त्रिपाठी ८ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. सीरिजमध्ये कालीन भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी रसिका दुग्गलची एकूण संपत्ती सात कोटी रुपये इतकी आहे. मिर्झापूरचा बबलू पंडित अर्थात विक्रांत मेस्सी हा आठ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. -
संपत्तीची माहिती scoopwhoop.com वरून घेण्यात आली आहे.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…