-
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर.
-
अभिजीतच्या पत्नीचं नाव सुखदा खांडकेकर असं असून ती देखील अभिजीत प्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत. अभिनेत्री सुखदा खांडकेकरचा आज वाढदिवस आहे.
-
अभिजीत आणि सुखदा यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् पुढे लग्नात झालं.
-
आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे.
-
अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे.
-
सुखदाने काही मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
विजय केंकरे यांच्या 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' आणि मकरंद देशपांडे यांच्या 'शेक्सपिअरचा म्हातारा' या मराठी नाटकातून तिनं काम केलं होतं.
-
सुखदाने 'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. तिचं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे नाटक विशेष गाजलं.
-
संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातही तिनं काम केलं आहे.
-
सुखदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सुखदा बरेचदा आपले फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते. (सर्व फोटो : अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर / इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल