-
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जून घेतलं जातं. (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)
-
मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे.
-
मराठीतील मोजक्या ग्लॅमरस नायिकांपैकी एक असा लौकिक असला, तरी प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे.
-
प्रिया मूळची मुंबईची. सुरुवातीला बालकलाकार म्हणून काही मोजक्या चित्रपटांतून ती दिसली.
-
‘आभाळमाया’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’सारख्या त्या काळातील गाजलेल्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका करण्याची संधी तिला मिळाली.
-
‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांतून प्रियाने छोट्या, पण लक्षवेधी भूमिका केल्या होत्या.
-
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे प्रिया बापट हे नावही चित्रपटसृष्टीत रुळले.
-
प्रियाच्या अभिनयाची चुणूक ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून दिसली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.
-
‘नवा गडी नवा राज’, ‘वाटेवरती काटे गं’ यांसारख्या नाटकांमधून ती रंगभूमीवरदेखील कार्यरत राहिली.
-
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांनी सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं.
-
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे.
-
स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो.
-
अभिनेत्री प्रिया बापटनं आपल्या बहिणीसोबत 'सावेंची' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
-
प्रियाने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका