-
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसल्याचे दिसते. मात्र, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सेलिना चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी सेलिनाने गरोदरपणाशी संबंधीत तिचा एक भाविनक अनुभव सांगितला होता.
-
सेलिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करतं ही माहिती दिली आहे. जुळ्या मुलांना जन्म देताना तिला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले याबद्दल देखील तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
-
तिने ही पोस्ट 'जागतिक मातृदिनानिमित्त' केली होती. सेलिनाने २०१२ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर पुन्हा एकदा २०१७ मध्ये ती गर्भवती होती. त्यावेळी देखील तिच्या गर्भात दोन मुलं होते.
-
मात्र, त्यापैकी एका बाळाला वाचवता आले नाही, त्या बाळाला हृदयाशी संबंधीत गंभीर समस्या होती. याघटने नंतर सेलिना आणि तिचा नवरा पीटर हाग यांना धक्काच बसला.
-
तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सेलिनाने दोन्हीवेळी गर्भवती असतानाचे फोटो शेअर केले आहेत. "मला अजूनही माझा नवरा पीटरचा चेहरा आठवत आहे. जेव्हा आमचे डॉक्टर ब्रेथव्हाइट यांनी मी पुन्हा एकदा जुळ्या मुलांना जन्म देणार हे सांगितले."
-
"कारण हे आश्चर्यकारक आणि असामान्य आहे. ७ लाख लोकांमध्ये एकाला ही संधी मिळते, असे सेलिनाने सांगितले."
-
पुढे सेलिनाने सांगितले की "दोन्ही वेळेस मी स्वत:ची काळजी घेत होती. मधुमेह असल्यामुळे दोन्ही वेळी मी काय खाते काय करते याचे पालन केले."
-
"मात्र, दुसऱ्यांदा गर्भवती असताना मी माझ्या वडिलांना गमावले. त्यांच्या निधनाच्या बातमीने माझ्यावर गंभीर परिणाम झाला होता."
-
"मी चालण्याची क्षमता गमावली होती. माझा नवरा मला सगळीकडे व्हीलचेअरवर घेऊन जायचा. यामुळे माझ्या हाडांवर या सगळ्याचा परिणाम झाला आणि माझी मुलं माझ्या हृदयाजवळ दाबले गेले होते, त्यामुळे मला श्वास घेणे अवघड झाले होते."
-
सेलिना पुढे म्हणाली, "हायपो प्लास्टिक हार्टमुळे शमशेर या आमच्या मुलाला आम्ही गमावले. तर दुसऱ्या मुलाला तीन महिन्यांपर्यंत इनक्यूबेटरमध्ये ठेवल्यानंतर माझ्या आईचे अचानक झालेले निधन…या सगळ्या परिस्थितीत मला विश्वास आहे की मातृत्वाने मला शक्ती दिली."
-
"मला माहित नाही माझ्याकडे एवढी शक्ती होती. माझी आई इनफ्रेंट्री अधिकाऱ्याची पत्नी असल्याने माझ्या आईने आम्हाला एकटीने सांभाळलं."
-
"आज आम्ही जे काही आहोत त्यासाठी माझ्या आईने खूप काही केले," असे म्हणतं सेलिनाने सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली