-
बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लालने २००५ मध्ये एण्ट्री केली. स्नेहाचा पहिला चित्रपट हा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत होता. तिच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
-
त्याच कारण सलमान नाही तर तिचे विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन सारखे दिसणे होते. आज ही स्नेहा काय करते आपण जाणून घेणार आहोत.
-
'लकी : नो टाईम फॉर लव्ह ऑल' या चित्रपटातून स्नेहाने पदार्पण केले होते. स्नेहा आणि ऐश्वर्यामध्ये फारसे साम्य नाही.
-
सलमान असूनही या चित्रपटाला लोकप्रियता मिळाली नाही. तर अनेकांना वाटले की स्नेहाची ऐश्वर्याशी सतत होणाऱ्या तुलनेमुळे कदाचित लोकांना तिचा अभिनय दिसला नाही. त्यामुळे ती अपयशी ठरली असे म्हटले जाते.
-
स्नेहाने 'आयएएनएस'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ऐश्वर्यासोबत होणाऱ्या तुलनेवर स्नेहाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. "मी जशी आहे तसे राहायला मला आवडते. तर त्या सर्व तुलनांचा मला त्रास होतं नाही."
-
पुढे ती म्हणाली, "माझे वर्णन तसे करावे ही त्यांची पीआर स्ट्रॅटर्जी होती. त्या सगळ्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष हे फक्त तुलनेकडे गेले. अन्यथा, ही एवढी मोठी गोष्ट झाली नसती."
-
१५ वर्षांनंतर स्नेहाने Zee5 thriller या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. Zee5 thriller या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'एक्सपायरी डेट' या वेबसीरिजमध्ये स्नेहाने काम केलं. (All Photo Credit : Sneha ullal)

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!