बॉलिवूडचा भाईजान म्हणून सलमान खान ओळखला जातो. नुकताच प्रदर्शित झालेला 'राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटामुळे सलमान चर्चेत होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. मात्र, एवढं असूनही पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आज आपण सलमानने कोणत्या चित्रपटांना नकार दिला आणि नंतर ते चित्रपट सुपरहिट झाले त्या बद्दल जाणून घेणार आहोत. -
सलमानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सलमानने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते.
-
या चित्रपटा नंतर सलमान दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटात दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि सलमान एका रात्रीत सुपरस्टार बनला.
-
यानंतर सलमानने मागे वळून पाहिले नाही. फार कमी लोकांना माहित आहे की सलमानने अनेक चित्रपटांना नकार दिला आणि ते चित्रपट नंतर सुपरहिट झाले.
-
कल हो ना हो – करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. शाहरुख शिवाय या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, अशा चर्चा होत्या की सैफच्या भूमिकेसाठी सगळ्यात आधी सलमानला विचारण्यात आले होते. तर सलमानने या चित्रपटासाठी नकार दिला होता.
-
गजनी – आमिर खानचा हा चित्रपट प्रत्येकाच्या लक्षात आहे. या चित्रपटातील आमिरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. असे म्हटले जाते की, आमिरच्या आधी सलमानला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते.
-
बाजीगर – १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाजीगर' या चित्रपटात शाहरुख खानने नकारात्मक भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शाहरुखच्या करिअरमधला महत्त्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी देखील शाहरुख आधी सलमानला विचारण्यात आल्याचे म्हटले जाते.
-
चक दे इंडिया – हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट झाला. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली. मात्र, असे म्हटले जाते की आधी या चित्रपटासाठी सलमानला विचारण्यात आले होते.
-
जोश – या चित्रपटासाठी सलमानला विचारण्यात आले होते. एवढंच नाही तर आमिर खानला ही विचारण्यात आल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटात शाहरुखसोबत ऐश्वर्या राय देखील होती. ऐश्वर्या आणि शाहरुखने भाऊ- बहिणीची भूमिका साकारली होती. या कारणामुळे सलमानने या चित्रपटाला नकार दिल्याचे म्हटले जाते.
-
लवकरच सलमान 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटात दिसणार आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला