-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस'. 'बिग बॉस'चा नवीन सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यंदा 'बिग बॉस' नवीन अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोच्या प्रत्येक सीजनमध्ये काही स्पर्धकांकडून वादग्रस्त वक्तव्य केली गेली आहेत. पाहुयात कोण आहेत ते स्पर्धक ज्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात आणि बाहेर देखील चांगलीच चर्चा सुरू झाली होती. ((Photo-Loksatta File Image)
-
अभिनेत्री हिना खान 'बिग बॉस'च्या 11व्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. हिनाने जरी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले असले तरी तिने शोच्या दरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ती म्हणाली की "मी साऊथमधील सिनेमांसाठी कधीच काम करणार नाही." त्याबरोबरच तिने त्या अभिनेत्रींचं बॉडी शेमिंग केले होते. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यमुळे तिला प्रेक्षकांनाकडून तसंच साऊथ कलाकारांकडून पण चांगलचं सुनावण्यात आले होते. (Photo-Loksatta File Image)
-
'बिग बॉस'च्या ६ व्या सीजनचा वाइल्ड कार्ड स्पर्धक इमाम सिद्दीकीने चक्क होस्ट सलमान खानला 'टाइम आऊट' असं म्हणाला होता. ज्यानंतर सलमानच्या फॅन्सने इमाम सिद्दीकीला चागलेच ट्रोलं केले होते.(Photo-Loksatta File Image)
-
प्रियांका जग्गाने तर सलमान खानचा अंत पाहीला होता. 'बिग बाॅस'च्या १० व्या सीजनच्या दरम्यान तिने घरात धींगाणा घालून इतर स्पर्धकांना नकोस करून सोडले होते. त्यानंतर सलमाने प्रियांकाला शो सोडून जाणयसाठी सांगितले. पुढे त्याने शोच्या निर्मात्यांना सांगितले की जर ही कलर्सच्या कोणत्या ही कर्यक्रमात सामील झाली तर तो कलर्ससोबत काम नाही करणार.(Photo-Loksatta File Image)
-
स्वामी ओम यांना पण सलमान खान ने बाहेरचा रस्ता दखवला होता. त्यांनी स्पर्धकांवर लघुशंका फेकली होती. त्यांच्या या वागण्यावरून होस्ट सलमान खान देखील संतापला आणि त्याने स्वामी ओम यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
-
अरमान कोहलीने ७ व्या सीजनमध्ये सह स्पर्धक एंडी अणि अभिनेत्री काम्या पंजाबी विरोधात अप शब्द वापरले होते त्यामुळे सलमान खानने त्याला चांगलेच सुनावले होते. नंतर त्याने एंडी अणि अभिनेत्री काम्याची माफी देखील मागीतली होती.(Photo-Loksatta File Image)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video