-
अभिनेत्री समीर रेड्डी ही हिंदी तेलगू आणि तामिळ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर इंटरेस्टिंग पोस्ट शेअर करत असते. नुकतीच समीराने बॉडी पॉझिटीव्हीटी बद्दल एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने वजन कमी करा मात्र त्याचं ओझं बाळगू नये असा सल्ला फॅन्सना दिला आहे. (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
1. या पोस्टमध्ये ती म्हणाली की," निगेटिव्हिटी, मत लोक काय म्हणतील, याकडे लक्ष देऊ नये . यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेली चांगली माणसं, गोष्टींचा आनंद उपभोगू शकत नाहीत". (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
2. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलगा हंस सोबत एक फोटो शेअर केला होता.(Photo-Instagram/Sameera Reddy)
-
3. "लोक नेहमीचं निगेटिव्हिटी कडे लक्ष देतात. जे की चूक आहे. मी आधी जितकी खुश होती. तेवढीच खुश मी आता पण होते." असे ती सांगते.(Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
4. ती पुढे लिहिते की, "माझं जानेवरी २०२१ ला ९२ किलो वजन होतं. आणि मी आता १० किलो कमी केलं. मी आधी जितकी खुश होते. तेवढीच खुश मी आता पण आहे." असे तिने त्या व्हिडीओत सांगितले आहे .(Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
5."तुम्ही स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी, स्वतःचं महत्व समजणं गरजेचं आहे आणि यालाच बॉडी पॉझिटीव्हीटी म्हणतात." असे समीराने सांगितले.(Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
6. याआधी देखील समीराने व्हीडिओच्या माध्यमातून बॉडी पॉझिटीव्हीटी, तुम्ही तुमच्या शरीराला जसे आहे तसे स्वीकार करा. असे सांगताना दिसली आहे. (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
7. समीरा तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या फिटनेस,आई झाल्यावर त्वचेची काळजी कशी घ्यावी, तसंच योगासनचे महत्व अश्या अनेक गोष्टींचे व्हिडीओ शेअर करते.(Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
8. याच बरोबर समीरा तिच्या व्हिडीओच्या मध्यमातू मानसिक स्वास्थ्य, बॉडी इमेज आणि बऱ्याच गोष्टींबद्दल बोलत असते. (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
9. अभिनेत्री समीरा रेड्डी ही बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
10. २००२ मधील लोकप्रिय चित्रपट 'मैने दिल तुझको दिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
11. समीराने २०१४ मध्ये बिझनेसमन अक्षय वर्देशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. (Photo-Instagram/ Sameera Reddy)
-
12. समीरा रेड्डी काही काळ जरी बॉलिवूडपासून लांब राहिली असली तरी तिचे फॅन्स अजूनही तिच्यावर प्रेम करताना दिसतात.(Photo-Instagram/ Sameera Reddy)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”