-    सध्या सोशल मीडियावर एका दरीतील तुटलेल्या ट्रॅकवरून ट्रेन कोसळताना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झालेत. 
-    डर्बीशायरच्या स्थानिक छायाचित्रकार जिमने सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलंय. 
-    या व्हिडीओममध्ये बॅकग्राउंडला एक हेलिकॉप्टर देखील उडताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही घटनेचा नसून एका चित्रपटाच्या शूटिंगमधल्या खतरनाक स्टंटचा आहे. 
-    'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रुझ कायमच आपल्या दमदार अभिनयाने नवा बेंचमार्क सेट करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असतो. त्याच्या आगामी ‘मिशन: इम्पॉसिबल’चा सातव्या आणि आठव्या सीरिजचं बॅक टू बॅक शूटिंग सुरू करण्यात आलंय. 
-    या सीरिजच्या शूटिंग सेटवरचा हा बीटीएस व्हिडीओ आहे. हा शानदार अॅक्शन सीन नुकतंच डर्बीशायरमध्ये शूट करण्यात आलाय. 
-    या सीनमध्ये एक ट्रेन एका खडकावर आदळल्यानंतर कोसळताना दाखवण्यात आलंय. डर्बीशायरच्या स्टोनी मिडलटनमध्ये हा सीन शूट करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती. 
-    'मिशन: इम्पॉसिबल ७' च्या लेसेस्ट स्टंट शूटिंग दरम्यान आजूबाजूला उपस्थित असलेल्या स्थानिक फोटोग्राफर आणि लोकांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. 
-    ‘मिशन: इम्पॉसिबल ७’ च्या सेटवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 
-    हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुझ स्वतः सर्व स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मिशन: इम्पॉसिबलच्या शूटिंगवेळी टॉम क्रुझही उपस्थित होता. 
-    कोरोना महामारीमुळे 'मिशन: इम्पॉसिबल ७' चं शूटिंग आणि रिलीज थांबवण्यात आलं होतं. आता येत्या २०२२ मध्ये 'मिशन: इम्पॉसिबल ७' रिलीज होणार आहे. (All Photos : DR Movie News/villagerjim) 
 
  अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी….. 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  